वन्य पशु संवर्धन दिन

10 Jun 2024 11:41:33
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कन्या शाळा व ज्युनिअर कॉलेज विभागामध्ये दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जागतिक वन्य पशु दिन संवर्धन दिनाचे आयोजन करण्यात आले .याप्रसंगी विद्यार्थिनींनी दुर्मिळ वन्यजीवांची चित्रे रेखाटलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले .या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध शल्यचिकित्सक व पर्यावरण अभ्यासक डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर श्रोत्री यांनी विश्वाची उत्पत्ती ,मानव जीवाची उत्पत्ती ,मुंग्यांची शेती अशा विविध विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0